पैठण शहरामध्ये आज ब्राह्मण समाज संघटनेची स्थापना

Foto
पैठण, (प्रतिनिधी): हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार फडकविणारे अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून, आज दक्षिण काशी पैठण येथून ब्राह्मण समाज संघटनेफ्ची येणार स्थापना करण्यात असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष योगेश जोशी यांनी दिली आहे.

गाव, राज्य, देश तसेच परदेशात वास्तव्यास असलेल्या ब्राह्मण समाजासाठी ही संघटना कार्य करणार आहे, समाजामध्ये सामाजिक ऐक्य, शैक्षणिक प्रगती, सांस्कृतिक जतन, आर्थिक सक्षमीकरण आणि समाजसेवा या मूल्यांच्या आधारे कार्य करण्याचा संघटनेचा मानस आहे, संविधानाचा आदर, कायद्याचे पालन तसेच सर्व समाजांशी सलोखा राखून संघटनेचे कार्य केले जाणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

परदेशात राहणाऱ्या समाजबांधवांसाठीही संघटना सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार
कार्य करणार असून, परदेशात जन्मलेल्या किंवा परदेशात ज्यांचा जन्म दाखला मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना भारतात जन्म दाखला मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच परदेशात नोकरी करणाऱ्या मुला-मुलींना भारतात परत येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि समाजबांधवांच्या मानसिक समस्या तणावासह विविध सोडविण्यासाठी संघटना पुढाकार घेणार आहे. 

संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्य आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, गरजू कुटुंबांना शिक्षण, आरोग्य व आपत्कालीन मदत, युवक-युवतींसाठी रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण, तसेच महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

आरोग्यविषयक सेवा, धार्मिक, सांस्कृतिक, वैदिक, साहित्यिक व बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन, वधू वर परिचय मेळावे, कौटुंबिक समुपदेशन आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना मदत करण्यावरही संघटनेचा भर राहणार आहे. संविधानाचा आदर, कायद्याचे पालन आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासणे ही संघटनेची प्रमुख उद्दिष्टे असून, संघटनेची कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष योगेश सोमनाथराव जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.